Archive

Posts Tagged ‘television’

संवाद…

संवाद हा मानवी जीवनात किती महत्वाचा आहे ना! संवाद साधल्याशिवाय तुमच्या मनात काय आहे हे समोरच्या व्यक्तीला समजू शकत नाही, त्यामुळे त्याच्या कडून तुम्हाला हवी ती क्रिया घडत नाही.

पण हाच संवाद हल्लीच्या काळात किती कमी होतो आहे, आता असं म्हणायचं मुख्य कारण आहे ते टेलीव्हीजन. सध्या प्रत्येक घरात साधारणपणे हे उपकरण असतेच असते. मग काय ह्याच्या मागून येणारे फायदे आणीं तोटे देखील घरात शिरतात. ह्याचा सर्वात मोठा तोटा माझ्यामते तरी हा कि घरातील व्यक्तींमध्ये असलेला संवाद कमी होतो, मग तो संवाद कुठल्याही प्रकारातील असेल जस कि भांडण, वादावादी, प्रेमाच्या चार गोष्टी किवा अगदी जनरल संभाषण.
टीव्ही वर सध्या असणारे खंडीभर च्यानल्स आणि त्यावर दाखवल्या जाणाऱ्या मालिका ह्यामध्ये माणूस एवढा गुरफटला आहे कि त्याला घरातील इतर व्यक्तींशी बोलायला सवडच नसते किवा इच्छा नसते असं म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही. हा अनुभव मला तसेच तुम्हा सर्व वाचकांनादेखील थोड्याफार प्रमाणात का होईना पण आला असेल किवा नेहमी येत असेल.
मी काही टीव्हीच्या विरोधात असणारा माणूस नाही पण काय बघावं आणि काय नाही, तसेच किती प्रमाणात बघावं ह्याच्या मर्यादा मी स्वतः पाळतो. जेवा एखादी महत्वाची गोष्ट बोलायची असेल त्या वेळेस अतिशय काळजीपूर्वक बोलले पाहिजे अश्यावेळेला जर आपण किवा समोरील व्यक्ती टीव्ही मध्ये लक्ष घालून बसली असेल तर त्या विषयाचे गांभीर्य त्या व्यक्तीला कळणारच नाही . दुसरा मुद्दा महणजे खरच त्या मालिका बघून आपल्याला काही उपुक्ता माहिती मिळत असेल तर काही हरकत नाही पण तसे काहीच ह्या मालिकांमध्ये नसते, बर नुसते मनोरंजन म्हणून पहाव्यात तर त्यामध्ये कपट, राजकारण, अनैतिक संबंध तसेच अध्यात्मिक बाबींचा नको तसा वापर अश्या काही प्रमाणात केलेला असतो कि ते सर्व बघून मनोरंजन होऊ शकत असं मला तरी वाटत नाही….. अर्थात हे सर्व विचार व्यक्तिगणिक बदलूही शकतात.
घरी गेल्यावर कुटुंबियांशी संवाद साधण्यात किती आनंद वाटतो हे काही मी तुमच्यासारख्या सुजाण वाचकांना सांगायची गरज आहे असे वाटत नाही. काही झाल तरी मानव हा सामाजिक प्राणी (प्राणी म्हटल्याबद्दल माफी असावी) आहे, त्यामुळे प्रत्येकाला दुसऱ्या व्यक्तीशी बोलण्याची गरज भासते, स्वतःचे विचार, अडचणी, भावना व्यक्त केल्याशिवाय मानवाला हायसं वाटत नाही. संवाद साधणे हि देखील एक कला आहे, कधीही बघा मार्केटिंग क्षेत्रातील माणस हि बडबड्या स्वभावाची असतात म्हणूनच ती माणसे आपली वस्तू व त्याचा उपयोग समोरच्याला पटवून देण्यात यशस्वी ठरतात, पण हेच कौशल्य सर्वांकडे असेलच असे नाही. अगदी भिकारी देखील त्याचे संवाद कौशल्य वापरून थोडेफार पैसे स्वतःच्या पदरात पाडून घेतोच कि नाही?
हल्ली तर पर्सनलीटी डेव्हलपमेंट सारख्या कोर्सेस मधूनदेखील संवाद साधण्याचे ट्रेनिंग दिले जाते, पण खरच अश्या कोर्सेस मधून संवाद साधण्याची कला विकसित होऊ शकते का हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.म्हणूनच संवाद हा मानवी जीवनातील अनिवार्य असा घटक आहे, त्यामुळे कारण काहीही कसलेही असो मानवाने सदैव संवाद साधण्याचा प्रयत्न करत राहिले पाहिजे……
प्रवर्ग: सामाजिक टॅगस्, , , ,